आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देताच जामनेर रोडची दुरुस्ती सुरू

कुऱ्हे पानाचेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यातील सूर नदी ते भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीपर्यंत रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. यामुळे कुऱ्हे पानाचे तसेच परिसरातील नागरिक त्रस्त होते. या संदर्भात कुऱ्हे पानाचे येथील अतुल रवींद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयास रास्ता दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी निवेदन दिले होते. रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत अभियंता बी.सी.तायडे यांनी रस्त्याची पाहणी केली. यानंतर नुकतीच दुरुस्तीला सुरुवात झाली.

भुसावळ ते जामनेर दरम्यान सूर नदीपर्यंतच्या रस्त्याची दोन-चार महिन्यानंतर डागडुजी केली जाते. मात्र, अतिशय कमी कालावधीत हे खड्डे पुन्हा जैसे थे होतात. त्यामुळे शासनाच्या निधीचा चुराडा होतो. शिवाय वाहन चालकांची हाडे देखील खिळखिळी होतात. आताही सूर नदी ते भुसावळातील नाहाटा चौफुलीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालक त्रस्त होतो. याबाबत वारंवार विनंती करून देखील दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे कुऱ्हे पानाचे येतील अतुल पाटील ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली. ईश्वर पवार, राहुल पाटील, अमोल ओतारी, अमोल शक्ती, रोहन पाटील, मयूर बोबडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...