आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:विसर्जनापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती; बाप्पा पावला

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश स्थापनेपूर्वी पालिकेने खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढून वर्कऑर्डर दिली होती. मात्र, गणपती बाप्पाचे आगमन होऊनही प्रत्यक्ष डागडुजी झाली नाही. मात्र, आता विसर्जनापूर्वी शहरातील प्रमुख मार्ग व मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. यामुळे विसर्जनापूर्वी गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवापूर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गणेश स्थापनेपूर्वी खड्डे बुजवले गेले नाहीत. यामुळे यंदाही विघ्नहर्ता गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच झाले. यामुळे शहरातून ओरड वाढल्यानंतर पालिकेने आता शहरातील प्रमुख मार्ग व विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे. यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून यावल रोडची दुरुस्ती झाली. यानंतर पालिकेला उशिरा का असेना जाग आली आहे. शहरातील जामनेर रोडपासून या कामाला सुरुवात झाली. दोन दिवसांत ते पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...