आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन तीव्र:रस्त्यांची दुरुस्ती करा, रेल्वेची रिक्त पदे भरावी ; कामगारविरोधी धोरणांचा निषेध

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जीर्ण निवासस्थाने व रेल्वे हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती, रिक्त पदांवर भरतीसह विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे अनिश्चित काळासाठी येथील डीआरएम कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधिया यांनी केले. आंदोलनात मंडळ सचिव एस. बी. पाटील, मंडळ सचिव वर्कशॉप किशोर कोलते, मंडळ समन्वयक एस.के. दुबे, मंडळ संघटक पी.के. रायकवार, महिला अध्यक्ष कुंदलता थूल यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास रेल्वेचा चक्काजाम करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनोगातून दिला. यावेळी धरणे आंदोलनात सर्व शाखा सचिव, शाखाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाषणे देत केद्र सरकारच्या विरूध्द घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडूनही सरकार लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. सोमवारीही आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे.

अशा आहेत मागण्या तिकीट चेकींग स्टाफला रोटेशनमध्ये भेदभाव दूर करावा, एसपीएडी केसेसमध्ये रेल्वे सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत घ्यावे, कर्मचाऱ्यांचे थांबविलेले टीए तात्काळ द्यावे, तिकीट चेकींग स्टाफला अमेनिटी मध्ये रेल्वे बोर्डच्या नियमानुसार डबे वाटप करावे, रिक्त पदे भरावी, मुख्यालयाच्या आदेशनुसार सहा ट्रॅक मेन्टेन्स कर्मचाऱ्यांना सीअॅण्डडब्ल्यू मध्ये सोडण्यात यावे, टीटीई लॉबीमध्ये सुविधा, भुसावळ बुकींग ऑफिसमध्ये थंड पाण्याचा कुलर लावावा, आदी मागण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...