आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत द्या; जिल्हा ग्राहक आयोगाचे भुसावळच्या संतोषीमाता सह. पतसंस्थेला आदेश

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संतोषीमाता मर्चंट को.ऑप क्रेडीट सोसायटीने मुदत संपूनही ठेवी परत न दिल्याने राजेंद्र त्र्यंबक पाटील, कल्पना माने, मोहन मुरलीधर धांडे यांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली होती. या प्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने ठेवीदारांना ९ टक्के व्याजदारासह ठेवी परत कराव्या, असे निर्देश दिले. तसेच ठेवीदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रार खर्चापोटी ५ हजारांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.

भुसावळ येथील ठेवीदार राजेंद्र त्र्यंबक पाटील, कल्पना माने, मोहन मुरलीधर धांडे वगैरेंनी संतोषी माता पतसंस्थेत ठेव रक्कम जमा केली होती. या ठेवीची मुदत संपल्यावर रक्कम व्याजासह परत देण्याची मागणी करूनही संस्थेने टाळाटाळ केली. त्यांनी ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. या तक्रारीत मोहन धांडे यांचे व कुटुंबाच्या ठेव पावतीच्या देय दिनांक पावेतो एकूण ४५ ठेव पावतीची रक्कम २२,७५,०१६ संस्थेकडे थकबाकी होती. राजेंद्र त्र्यंबक पाटील यांची १ लाख १६ हजार व कल्पना माने यांचे २ लाख रुपये संस्थेकडे थकबाकी आहे. या तिन्ही ठेवीदारांच्या तक्रारींवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने २२ ऑगस्टला निर्णय दिला. आयोगाचे प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी हे आदेश दिले. तकारदारातर्फे अॅड. राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...