आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:शहरातील सर्व्हे क्रमांक ६८ वरील पालिकेचे आरक्षण रद्द ; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका हद्दीतील स.न. ६८/१+५ व ६८/२ अनुक्रमे प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा व उद्यानासाठी आरक्षण क्रमांक १८ व ३७ अन्वये सन १९८५ सालापासून आरक्षित होते. मात्र, या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सदरील आरक्षण रद्द करुन ३१ मे पर्यंत आरक्षण मुक्तीचे नोटिफिकेशन जाहीर करावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पालिकेला दिले आहे.

नगरपरिषद हद्दीतील भूखंड क्रमांक स.न. ६८/१+५ व ६८/२ अनुक्रमे प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, बगीचा-साठी आरक्षित केले होते. मात्र, जमिनीचे संपादन प्रक्रिया शासनाने पूर्ण केली नव्हती. याप्रकरणी जमीन मालक पद्मा गोपाळ तिवारी, कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, पोपट कोल्हे, प्रल्हाद गोपाळ फालक यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये भुसावळ पालिकेला नोटीस देऊन सदरील भूखंडांचे संपादन करावे व त्याचा मोबदला द्यावा, अन्यथा कलम १२७ नुसार जमीन आरक्षणातून मुक्त झाल्याचे मानण्यात येईल, अशी नोटीस दिली होती.

मात्र, पालिकेने प्रतिसाद दिला नाही. यामुळे जमीन मालकांनी अॅड. अजय तल्हार यांचे मार्फत औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या. त्यावर द्वि सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात आरक्षण क्रमांक १८ व ३७ हे व्यपगत झाल्याचे जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...