आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:वक्तृत्व स्पर्धेतून व्यक्त केला गुरुंप्रती आदरभाव

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावल शहर व तालुक्यात सोमवारी शिक्षक दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. ठिकठिकाणी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजनदेखील, वक्तृत्व स्पर्धा झाल्या.

शशिकांत चौधरी कन्या विद्यालयात मुलींनी अध्यापनाची जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व कार्य’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. पाचवी ते सातवीच्या गटात तेजस्विनी मनोज सुरवसे, सुहाना बबलू तडवी आणि आठवी ते दहावीच्या गटात कोमल पंकज सोनवणे, प्रतीक्षा कैलास कोळी विजेते ठरले. सूत्रसंचालन कोमल सोनवणे यांनी केले.

डोंगरकठोरा ग्रामपंचायतीकडून शिक्षकांचा हृदय सन्मान, कर्मचाऱ्यांना गौरवले तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीने शिक्षकांचा सत्कार केला. माजी सरपंच तथा अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे अध्यक्ष, तर सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, माजी सरपंच मनोहर महाजन, ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगडे, केंद्र प्रमुख महंमद तडवी, प्राचार्य डॉ.दिलीप भोळे, मुख्याध्यापक नितीन झांबरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कल्पना राणे यांनी केले. नंतर महिला महाविद्यालय, अ.ध.चौधरी विद्यालय, जि. प.मराठी व उर्दू शाळा, शासकीय आश्रमशाळा, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला. सरपंच नवाज तडवी, ग्रा.पं.सदस्य कल्पना राणे, मनोहर महाजन, दिलीप तायडे, जुम्मा तडवी, एम.ई.जंजाळ, चारुलता झांबरे, हर्षाली जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. ४० वर्षांपासून शिक्षकांचा सत्कार करणारे डॉ.रवींद्र राणे यांचाही सत्कार झाला. ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रवीण कुयटे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...