आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे नुकतेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. फाऊंडेशनचे हे ८ वे वर्ष हाेते. अभिवादन स्वरूपात दरवर्षाप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात अाले. डाॅ.अांबेडकर मैदानावर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक विलास शेंडे, ॲड. सुनिल पगारे, डी.एस.हायस्कुलचे मुख्याध्यापक मोहनदास सपकाळे, प्रेम परदेशी, ॲड. प्रिया अडकमोल अादी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती दीपप्रज्वलन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे फाउंडेशनतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला.
असे केले साहित्य वाटप जमा झालेले साहित्य २० बॅग,२० कंपास ,२०० पेज रजिस्टर- १००,१००पेज रजिस्टर ६३,पेन १२५,लेटरपॅड ६०,पेन्सील २४,रबर १०,ड्राईंग कलर बाॅक्स छोटे, हातरुमाल १०७ पाकिट प्रत्येक एका पाकिटात १२ हातरूमाल,अादी साहित्य दिवसभरात संकलन झाले. फाउंडेशन च्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी प्रस्तावना केली. सचिव निर्मला सुरवाडे,सहसचिव शैला तायडे,सुजाता सपकाळे,आशा पठारे,दुर्गा सोनवणे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.