आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आत्मनिर्भर युवती‎ अभियानास प्रतिसाद‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिमाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ आणि यावल‎ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने,‎ आत्मनिर्भर युवती अभियान‎ कार्यशाळेचे आयोजन झाले. २७‎ फेब्रुवरी ते ४ मार्च या काळात‎ झालेल्या कार्यशाळेत डॉ. सचिन‎ देशमुख यांनी मार्गदर्शन केले.‎ महिलांनी आहार आणि‎ आरोग्याबाबत जागरुक राहिले‎ पाहिजे असे त्यांनी सांगितले.‎ अविनाश दहिफळे यांनी सायबर‎ गुन्ह्यांवर मार्गदर्शन केले.

रेखा‎ देशमुख यांनी विद्यार्थीनींना‎ स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर‎ होण्याचे मार्गदर्शन केले. तर शेखर‎ पाटील यांनी डिजिटल बँकिंग‎ व्यवहार काळाची गरज आहे असे‎ सांगितले. कार्यक्रमात कैलास‎ बारेला यांनी कृषी विषयक विविध‎ योजना, कृषी अवजारे तसेच सेंद्रीय‎ शेती या विषयावर भर दिला.‎ युवतींनी ग्रामीण रुग्णालय, पोलिस‎ स्टेशन, आय.डी.बी.आय बँक‎ आणि कृषी विभागाला क्षेत्रभेट‎ दिली. समारोप प्राचार्या डॉ. संध्या‎ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली‎ करण्यात आला होता.‎

बातम्या आणखी आहेत...