आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविमान तळावरून अहमदाबाद-जळगाव-मुंबई व मुंबई-जळगाव-अहमदाबाद ही विमानसेवा पूर्ववत करावी. पुणे व इंदूर हे नवीन हवाई मार्ग स्थापन करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी गुरूवारी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दिल्लीत केली.
ही सेवा सुरू करावी यासाठी मागील वर्षापासून अनेकवेळा पत्र व्यवहार केला आहे. तरीही नऊ महिन्यांपासून ट्रू जेट एअरवेज मार्फत जळगावसह सर्व विमानतळावरील वाहतूक बंद आहे. विमानतळावर कर्मचारी देखील उपलब्ध नाहीत. त्यासाठी ट्रू जेट एअरवेजला उपलब्ध करून दिलेला उडान योजनेचा आरसीएस स्लॉट देशांतर्गत हवाई सेवा देणाऱ्या इतर विमान कंपन्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा.
जळगाव विमानतळावर कमी दृश्यमानतेमध्ये आणि रात्रीच्या वेळी विमान उतरू शकण्याची सुविधा आयएफआर, बीसीएएसकडून कार्गो हाताळणीची परवानगी, श्रेणी-५ अग्निशमन सेवा उपलब्ध आहे. या विमानतळावर उडान योजनेच्या आरसीएस स्लॉटमध्ये समाविष्ट नसलेल्या हवाई मार्गावरील सेवा सुरु करणेबाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी खासदार खडसेंनी केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्याकडे केली. याबाबत खासगी कंपन्यांसोबत चर्चा करून जळगाव विमानतळहून हवाई सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.