आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनेतर्फे घटनेचा जाहीर निषेध:निवृत्त जवानाला पोलिस निरीक्षकांची मारहाण ; खा.रक्षा खडसे यांनी घेतली भेट

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील घुमावल येथील रहिवासी व सध्या चोपड्यातील शारदा नगर भागात राहणारे निवृत्त जवान पंकज दिलीप पाटील यांना, २ रोजी सायंकाळी चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी मारहाण केली. त्यामुळे जखमी जवान पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंकज पाटील हे मुलाला घेऊन २ रोजी सायंकाळी बाजारात गेले हाेते. या वेळी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तेथून जात असताना पंकज दिलीप पाटील यांना त्यांनी रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात बोलवले आणि पोलिस ठाण्यात चव्हाण यांनी पाटील यांंच्या कानशिलात मारली. यामुळे कानशिलात जबर दुखापत झाल्यामुळे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या संदर्भात चोपडा तालुक्यातील आजी-माजी सेवाभावी सैनिक संस्थेच्या सर्व जवानांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांना निवेदन देत, पोलिस अवतारसिंग चव्हाण यांच्या निलंबनाची मागणी केली. संघटनेतर्फे अध्यक्ष कैलास जगताप, उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, सचिव संदीप बडगुजर, कोषाध्यक्ष सुभाष शिरसाट, संग्राम कोळी, कैलास महाजन, सदाशिव अहिरे, शरद धनगर, प्रभाकर माळी, सतीश पाटील, वीर पत्नी कविता कदम यांनी निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...