आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव सोन्या-चांदीच्या भावात प्रचंड तेजी आल्याने गुंतवणूक म्हणून ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे. मात्र, असे असले तरी यापूर्वी कमी भावात सोने-चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांचे मोड करून पैसे मोकळे करून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोन्याचे भाव ५५ हजारांच्या पुढे गेल्यानंतर साेने मोडीचे प्रमाण १५ टक्क्यांनी तर चांदीचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे. साेन्या-चांदीकडे गुतंवणूक म्हणून बघणारा वर्ग जळगावसह खान्देशात गेल्या काही वर्षांपासून वाढताे आहे. सध्या साेन्याचे प्रतिताेळ्याचे दर रिटेल बाजारात ५५ हजार ५०० रुपयांपर्यंत पाेहचले आहेत. त्यामुळे साेने विक्री थंडावली आहे. तर माेडचे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या बाजारपेठेत येणारी माेड (साेने विक्रीला) अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे.
त्याच्या मागचे कारणे म्हणजे ग्राहकांना आणखी दरवाढीची अपेक्षा असल्याने माेडीसाठी ग्राहक पुढे येत नसल्याचे कारण आहे. मात्र, जसे भाव स्थिर हाेतात तसा माेडचा आकडा वाढत जाताे. लग्न समारंभासह, माैज, साखरपुडा, जन्माचा, लग्नाचा वाढदिवस आदी दिनविशेषला साेने खरेदी केली जाते. त्यासाेबत गुंतवणूक म्हणून साेन्याकडे बघणाऱ्यांचा वर्ग वाढत चालला आहे. यात गेल्या काही वर्षात महिला वर्गाचेही प्रमाण अधिक आहे. गुतंवणूक म्हणून बघणारा हा घटक शेअर बाजाराप्रमाणे दर वाढले की विक्री व कमी झाले की खरेदी करत असताे. सन २०११ मध्ये चांदीचे भाव ७५ हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यावेळी गुंतवणूक म्हणून चांदी घेऊन ठेवलेले अनेक ग्राहक ती मोडून आता पैसे मोकळे करून घेत आहेत. आगामी काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोने, चांदीत यापुर्वी गुंतवणूक केलेल्या नागरिकांना, गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळवता येणार आहे.
साेने (प्रतिताेळा) माेड : ५४५०० रिटेल : ५५५०० चांदी (प्रतिकिलाे) माेड : ६६००० रुपये रिटेल : ६९००० रुपये साेने ६० हजारांवर जाणार सरासरी माेड १० टक्के सामान्य परिस्थितीत साेने विक्रीच्या तुलनेत माेडचे प्रमाण १० ते १२ टक्के असते. ते दरवाढीनंतर २५ टक्क्यांपर्यंत गेलेले आहे. ग्राहक आणखी दरवाढीची वाट पाहताहेत.- अजय ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असोसिएशन
१० टक्क्यांवर असलेली मोड गेली २५ टक्क्यांवर गेल्या आठवड्यात साेन्याचे भाव किरकाेळ बाजारात ५५ हजार प्रती ताेळ्यावर पाेहचले. त्यामुळे सराफ बाजारात माेड येण्याचे प्रमाणही वाढले. साेन्याचे दर सामान्य असताना विक्रीच्या तुलनेत माेड १० ते १२ टक्क्यांपर्यंत असते. ती वाढून २५ टक्क्यांपर्यंत पाेहचली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. परंतु, ही अपेक्षित टक्केवारी नसल्याचे व्यापारी सांगतात. साेन्याचे दर वाढल्यानंतर माेड किमान ३०-३५ टक्क्यांपर्यंत पाेहचणे अपेक्षित हाेते. पण साेन्याचे प्रती ताेळ्याचे दर ६० हजार रुपयांपर्यंत पाेहचणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.