आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:1 ते 10 पर्यंत पास देण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शुक्रवारी आंदोलन; आमदार सावकारेंचा नशिराबाद टोलनाका व्यवस्थापनास इशारा

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका प्रशासनाने, १ ते १० तारखेपर्यंत मासिक पास काढता येईल. नंतरच्या कोणत्याही तारखेला पास मिळणार नाही असा फतवा काढला आहे. मात्र, हा निर्णय गुरुवारपर्यंत मागे घ्यावा. अन्यथा १७ जूनला टोल नाका बंद पाडू असा इशारा आमदार संजय सावकारे यांनी दिला.

नियमित ये-जा करणाऱ्या वाहन धारकास टोल नाक्यावरून मासिक काढता येतो. ज्या तारखेला पास काढला, त्या तारखेपासून पुढील एक महिना त्याची मुदत (वैधता) असली पाहिजे. मात्र, टोल नाका व्यवस्थापनाने मनमानी करत मासिक पास केवळ १ ते १० तारखेपर्यंतच काढता येईल. १० तारखेनंतर पास मिळणार नाही, असा फलक लावला आहे. म्हणजेच १० तारखेनंतर नियमानुसार टोलचे संपूर्ण पैसे भरावे लागतील. हा प्रकार लूट असल्याच्या तक्रारी वाहन धारकांनी आमदार सावकारे यांच्याकडे केल्या. त्याची दखल घेत आमदार सावकारेंनी जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा यांच्याकडे तक्रारी केल्या. यानंतरही तांत्रिक कारणे पुढे करून वेळ मारून सुरू आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत निर्णय मागे घ्या. अन्यथा शुक्रवारी भाजप आंदोलन करून टोलनाका बंद पाडेल असा इशारा आमदार संजय सावकारे यांनी दिला. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...