आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटात हाणामारी:भुसावळमध्ये दोन गटात दंगल, 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; संशयितांमध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या भावाचा समावेश

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन गटात हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनुसार सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला. संशयितांमध्ये माजी नगरसेवक प्रकाश (निकी) बत्रा व त्यांच्या भावाचा समावेश आहे.

पहिल्या गटातर्फे अशोक चंद्रलाल चुगेजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी तक्रार दिली. त्यात प्रकाश रमेशलाल बत्रा, विकी रमेशलाल बत्रा यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि.१) तक्रारदाराला भगवान झुलेलाल यांची प्रतिमा असलेला कंदील खाली पडल्याचे दिसले. त्यांनी संशयित निकी बत्रा यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर बत्रा यांनी तेथे येऊन संशयीतांसह बेदम मारहाण केली. दुसऱ्या गटातर्फे माजी नगरसेवक प्रकाश (निकी) बत्रा यांनी फिर्याद दिल्याने अशोक चंद्रलाल चुगेजा, कुणाल दिलीपकुमार छाबडीया, दिलीपकुमार गोवर्धनदास छाबडीया, नारायण अशोक ठारवानी आदींवर गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...