आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर वळण रस्त्याबाबत सूचना फलक नाहीत. पथदिव्यांअभावी सायंकाळनंतर अंधार पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त ५३ वर्षीय व्यक्तीला माजी नगरसेवक निर्मल कोठारी, गोसेवक रोहित महाले यांनी तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
जामनेर रोडवर संत गजानन महाराज मंदिरासमोर रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यावर कुठेही सूचना फलक नाहीत. कामामुळे पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. सोमवारी या भागातून दुचाकीवर जाताना गजानन देवरे (वय ५३, रा.पालखी हॉटेल परिसर, भुसावळ) हे गाडी घसरुन पडल्याने गंभीर जखमी झाले. परिसरातील गोसेवक रोहित महाले, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, मंदार चौधरी, डिंगबर चौधरी, वीरेंद्र तुरकेले, रोहन सपकाळे, अॅड. निर्मल दायमा, मंदार पाठक, योगेश कोल्हे, राजू सिंधवानी यांनी देवरेंना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवले. देवरे यांचा मोबाइल लॉक असल्याने नातेवाईकांचा शोध घेण्यात अडचणी आल्या. तोपर्यंत गोसेवक व नागरिकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन मानवतेचे दर्शन घडवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.