आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्तीचे नियोजन:पाइपलाइन बुजल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे नियोजन

भुसावळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून तापी नदीला जोडणाऱ्या ड्रेनेजचे काम हाती घेतले होते. यासाठी तापी नगरात खोदकाम करण्यात आले. पण, पाइपलाइन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे नियोजन नसल्याने माजी नगरसेवक अमोल इंगळे व रहिवाशांनी हे काम बंद पाडले होते. आता पालिकेने रस्ता दुरुस्तीचे नियोजन केले. यामुळे गेल्या पंधरवड्यापासून बंद असलेल्या या कामाला पुन्हा गती येईल.

जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर गाळ आऊटलेट ड्रेनेजमधून पुन्हा तापी नदीत सोडला जातो. मात्र, त्यासाठी तापीनगरातून जाणारी ही भूमिगत पाइपलाइन पूर्णपणे चोकअप झाली आहे. आता जलशुद्धीकरण केंद्राचे साडेपाच कोटी रुपये निधीतून पुनरुज्जीवन सुरू आहे. त्यात ड्रेनेज वाहून नेण्यासाठी १२ इंच व्यासाची पाइपलाइन बुजल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे नियोजन‎ ५५० मीटर लांबीची नवीन पीव्हीसी पाइपलाइन टाकण्याचे काम पालिकेने‎ सुरू केले होते. या पाइपलाइनसाठी २० फूट खोल खोदकाम केेेले जात आहे.‎

पण, या कामानंतर रस्ता दुरुस्तीचे नियोजन पालिकेने केले नव्हते. यामुळे‎ माजी नगरसेवक अमोल इंगळे व परिसरातील रहिवाशांनी विरोध करून रस्ता‎ खोदकाम २८ ऑक्टोबरला बंद पाडले होते. त्यानंतर काम बंद होते. आता‎ पालिकेने तोडगा टाकून पाइपलाइन टाकल्यावर रस्ता दुरुस्तीचे नियोजन‎ केले. त्यामुळे तिढा सुटून या कामाला पुन्हा सुरुवात होईल. जुन्या लाइनचीही‎ दुरस्ती : जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटरवर प्रक्रिया झाल्यानंतर गाळ पुन्हा‎ तापीत सोडला जातो. यासाठी नवीन ड्रेनेज पाइपलाइन टाकण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...