आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगरजीपणा:रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी मंजूर, वर्क ऑर्डर दिली; तरीही कामाला सुरुवात मात्र होईना

भुसावळ6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरातील महामार्गालगतच्या हॉटेल ग्रीन व्ह्यू मागील भागात गडकरी नगरातील रस्त्यांच्या कामांना वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली आहे. वर्क ऑर्डर देऊनही काम सुरू होत नसल्याने रहिवाशांनी पालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी दर्शवली.

खडका रोड चौफुली जवळील हॉटेल ग्रीन व्ह्यू (बगीचा हॉटेल) मागील गडकरी नगरातील रस्ते अनेक वर्षांपासून झालेले नाही. पालिकेने १२ कोटींच्या निधीतील कामानंतर पुन्हा ५ कोटींच्या निधीतून रस्ते विकासाची कामे हाती घेतली होती. या निधीतून गडकरी नगरातील हॉटेल ग्रीन व्ह्यू-च्या मागील भागातील रस्त्यांना मंजुरी मिळाली. पण, वर्ष उलटून कामांना प्रत्यक्षात सुरूवात नाही. गडकरी नगरातून महामार्गाच्या सर्व्हिस रोडला जोडणारा ऍप्रोच रस्ताही पूर्ण झालेला नाही. नियमानुसार महामार्ग प्राधिकरणाने १२ मीटर रुंदीचा हा रस्ता किमान ५०० मीटर अंतरापर्यंत पूर्ण करुन देणे अपेक्षित आहे. याकडेही दुर्लक्ष झाल्याने गडकरी नगरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

गडकरी नगरातून महामार्गाच्या सर्व्हिस रोडला जोडणारा ऍप्रोच रस्ताही पूर्ण झालेला नाही. नियमानुसार महामार्ग प्राधिकरणाने १२ मीटर रुंदीचा हा रस्ता किमान ५०० मीटर अंतरापर्यंत पूर्ण करुन देणे अपेक्षित आहे. याकडेही दुर्लक्ष झाल्याने गडकरी नगरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
चालणेही होते कठीण.

ग्रीन व्ह्यू हॉटेलमागील भाग पालिकेने दुर्लक्षित केला आहे. करदात्यांना रस्त्यांची मुलभूत सुविधाही दिली जात नाही. पावसाळ्यात तर चालणेही मुश्किल होते. पालिकेच्या प्रशासकांनी लक्ष द्यावे. जलील शेख, गडकरीनगर
मंजुरीनंतर रखडलेला गडकरी नगरातील रस्ता.

बातम्या आणखी आहेत...