आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा धोका:रोहित्रांचे स्वीच बॉक्स उघडेच; अपघाताची भीती

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख मार्गावरील सेंट्रल पोल सोबतच आता अंतर्गत भागातील महावितरणच्या ट्रान्सफार्मरच्या स्विच बॉक्सची मोडतोड झाली आहे. ऐन पावसाळ्यात ट्रान्सफार्मरखाली खडी किंवा वाळू टाकलेली नसल्याने तेथे गवत, झाडेझुडपे वाढत आहेत. उघड्या स्वीच बॉक्समुळे अपघाताचा धोका आहे.

शहरात महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर पेट्यांची अवस्था बिकट आहे. जामनेर रोड, पंढरीनाथ नगरात ट्रान्सफार्मरच्या पेट्या जमिनीलगत आहेत. त्यांची झाकणे निघून वीजप्रवाह असलेल्या तारा उघड्या पडल्या आहेत. इतर अनेक भागांमध्ये ट्रान्सफार्मरच्या कटआऊट स्विचबॉक्सचे झाकणे लोंबकळत आहेत. महावितरणच्या नियमांनुसार ट्रान्सफार्मरखाली गवत वाढू नये म्हणून वाळू किंवा खडी, कच टाकणे गरजेचे आहे. मात्र, शहरात अशी उपाययोजना दिसत नाही. यामुळे ट्रान्सफॉर्मर खाली पावसानंतर गवत, झाडेझुडपे वाढली आहेत. मोकाट जनावरे हे गवत खाण्यासाठी जातात. मात्र, उघड्या स्विचबॉक्समधील तारांचा स्पर्श होऊन अपघात होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...