आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावखेडा:सावखेडा विकासोची धुरा साहेबराव धनगर यांचेकडे

सावखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ३ रोजी झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदी साहेबराव धनगर व व्हाइस चेअरमन पदी भागवत पाटील हे विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी हात उंच करून मतदान झाले. त्यात १३ पैकी ७ जणांनी साहेबराव धनगर यांच्या बाजूने कल दिला. तर व्हाइस चेअमनपदासाठी भागवत पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध विजयी झाले. याप्रसंगी संचालक हेमंत चौधरी, भागवत पाटील, मधुकर पाटील, कासाबाई पाटील, मीना पाटील, सोपान पाटील, भागवत महाजन, प्रदीप महाजन, मोहन बखाल, हेमचंद्र महाजन, युवराज कराड, युसूफ तडवी, सचिव कैलास पाटील व अनिल पाटील, विकास पाटील, सुभान तडवी, अल्लाउद्दीन तडवी, रफिक तडवी, पंकज श्रीखंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...