आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:खुनाच्या गुन्ह्यातील साकेगावच्या तिघांचा जामीन रद्द; खंडपीठाने दिला निर्णय, भुसावळात पहिली कारवाई

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकेगाव येथील खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर असूनही पुन्हा उपद्रव माजवणाऱ्या तिघांचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी आैरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. हे अपील मान्य करून खंडपीठाने तीन आरोपींचे जामीन रद्द केले आहे. या प्रकारे झालेली ही भुसावळातील पहिलीच कारवाई आहे.

तालुक्यातील साकेगाव येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अनुक्रमे जयेश पाटील, महेश पाटील व मयूर पाटील हे तिघे जामिनावर बाहेर हाेते. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा उपद्रव माजवणे सुरूच ठेवले. यामुळे पोलिस प्रशासनाने कायद्याच्या आधार घेत या तिघांचे जामीन रद्द करावा, यासाठी औरगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. या अपिलाची दखल घेत न्यायालयाने वरील तिघांचे जामीन रद्द केले. तिन्ही आरोपींना ३० जूनपर्यंत स्वत: हजर होऊन किंवा अपेक्स कोर्टात अपील करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या प्रकारे ११ गुन्हेगारांचे जामीन रद्द करण्यासाठी खंडपीठात अपील केले आहे. त्यातील तिघांचे जामीन रद्द झाले. अजून ८ जणांच्या अपिलावर सुनावणी बाकी आहे. उपद्रव माजवणाऱ्या इतरही गुन्हेगारांचे जामीन रद्द करण्यासाठी अपील करणार असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...