आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:साकेगाव वाघूर नदी परिसराला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा; कामांसाठी 25 कोटींचा प्रस्ताव

भुसावळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकेगाव वाघूर नदीचा परिसर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असलेल्या परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या स्थळाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी द्यावा, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी पर्यटन विकास राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेतली.

शेळगाव बॅरेजचे काम पूर्णत्वास येत असल्याने साकेगाव पर्यंत वाघूर नदीचे बॅकवॉटर येणार आहे. या परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्यावर्षी रवींद्र पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत साकेगाव येथील वाघूर नदीच्या परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाला मान्यता देण्यात आली. दरम्यान, रवींद्र पाटील यांनी पर्यटन विकास राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेत साकेगाव जवळील वाघूर नदी परिसरातील ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाला २५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या.

गतवैभव प्राप्त होईल
साकेगावजवळील वाघूर नदीचा परिसर सुशोभित झाल्यानंतर पर्यटकांसाठी एक हक्काचे ठिकाण तयार होईल. तालुक्याचे वैभव देखील वाढेल. रोजगार निर्मितीला मदत होईल.
रवींद्र पाटील, माजी जि.प.सदस्य

बातम्या आणखी आहेत...