आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:सातोड, चिखली, मन्यारखेडा, रुईखेडा‎ येथे राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा‎

मुक्ताईनगर‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या‎ निमित्ताने अॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड, चिखली, मन्यारखेडा, रुईखेडा‎ येथील ग्रामस्थांशी संवाद साधला‎ रुईखेडा परिसरातील गावांची ‎जास्तीस्त जास्त शेती कोरडवाहू‎ आहेय या गावांमधील शेतीला पाणी ‎मिळावे, यासाठी आमदार एकनाथ ‎ ‎ खडसे यांनी मुक्ताई उपसा सिंचन‎ योजना राबवली. या योजनेचे ९०‎ टक्के काम पूर्णत्वास आले आहे.

परंतु सरकार गेल्यामुळे या कामाला‎ ब्रेक लागला. आगामी काळात माजी‎ मंत्री खडसे आणि राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा‎ करून लवकरच मुक्ताई उपसा‎ सिंचन योजनेचे पाणी रुईखेडा‎ परिसरातील शेतीपर्यंत आणले‎ जाईल. यातून हा परिसर सुजलाम‎ सुफलाम होण्यास मदत होईल, असे‎ त्यांनी सांगितले.

यावेळी‎ त्यांच्यासोबत राष्ट्रवादी संवाद यात्रा‎ प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे,‎ माजी जि.प.सदस्य नीलेश पाटील,‎ माजी सभापती विलास धायडे, प्रदीप‎ साळुंखे, यात्रा सहप्रमुख रामभाऊ‎ पाटील, चंद्रकांत बढे, सरचिटणीस‎ सुनील काटे, नंदकिशोर हिरोळे,‎ विजय भंगाळे, विनोद काटे, बाळा‎ भालशंकर, राहुल पाटील, विजय‎ कापसे, योगेश पाटील, सुभाष‎ खाटीक, प्रकाश खोंदले, सोनू‎ पाटील, विशाल रोटे, चंद्रशेखर बढे,‎ विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, चंद्रकांत‎ बढे, बाबुराव पाटील, वासुदेव घाडगे,‎ अतुल पाटील, विजय पाटील व‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी‎ उपस्थित होते. ग्रामस्थांनी संवाद‎ यात्रेचे स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...