आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:मेहतर वाल्मिकी समाजाच्या‎ राज्य अध्यक्षपदी संतोष बारसे‎

ऐनपूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव येथे मेहतर वाल्मिकी‎ समाजाच्या महाधिवेशनात अध्यक्ष‎ व कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात‎ आली. रविवारी मतदान घेऊन‎ लोकशाही पद्धतीने निवड करण्यात‎ आली. राज्यभरातून सुमारे पाच‎ हजार समाजबांधव शेगावला‎ अधिवेशनासाठी उपस्थित हाेते.‎ राज्य अध्यक्ष पदासाठी चार जण‎ निवडणुकीच्या रिंगणात हाेते. त्यात‎ १९५० मते मिळवून भुसावळ येथील‎ पैलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष‎ संतोष मोहन बारसे हे निवडून अाले.‎ कार्याध्यक्षपदी अमरावतीचे किशाेर‎ पिवाल निवडून अाले.‎ मतदानासाठी बहुसंख्येने‎ समाजबांधव उपस्थित होते.‎

विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय‎ हाेती. अध्यक्षपदासाठी चार‎ उमेदवार उभे होते. समाजबांधवांनी‎ मतदान करून ही निवड करण्यात‎ आली. निवडणूक समितीचे अध्यक्ष‎ हरीश धंजे यांच्या अध्यक्षतेखाली‎ ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या‎ निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष तसेच‎ मतदान अधिकारी म्हणून सुमारे ५०‎ शिक्षक, सेवानिवृत्त अधिकारी व‎ कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया‎ पार पाडली.

या निवडणुकीसाठी‎ समाजाच्या सर्व स्तरातून तसेच‎ नियोजन समितीचे सदस्य प्रकाश‎ घोगलिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी‎ सहकार्य केले. मेहतर वाल्मिकी‎ समाजात प्रथमच मतदान घेऊन‎ पदाधिकारी निवडीचा ऐतिहासिक‎ निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या‎ समाजाच्या युवक आणि महिला‎ वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत‎ आहे. बारसे यांच्या निवडीचे‎ भुसावळ शहरातही स्वागत झाले.‎

बातम्या आणखी आहेत...