आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच-उपसरपंच यांच्यात विकास कामाच्या मुद्द्यावर शाब्दिक वाद सुरू होती. यावेळी उपसरपंचाचा मुलगा मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग करत होता. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या सरपंचांनी त्यास स्वत:जवळील मोबाइल मारून फेकला.
वडोदा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. स्वप्ना खिरोळकर ह्या फेब्रुवारी २०२१पासून वडोदा येथील सरपंच, तर रंजना कोथळकर या उपसरपंच आहेत. दरम्यान, बुधवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. त्यात सरपंच व उपसरपंच या दोघांमध्ये गावातील विकास कामांच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद सुरू होते. हा प्रकार सुरू असताना उपसरपंचाच्या मुलाने मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच सरपंचांनी आपल्याजवळील मोबाइल व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याकडे फेकून मारला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वडोदा ग्रामपंचायतीमधील वाद चव्हाट्यावर आले.
याबाबत सरपंच स्वप्ना खिरोळकर यांना विचारले असता ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत कुणालाही व्हिडिओ शूटिंगची परवानगी दिलेली नव्हती. तरीही तसा प्रकार सुरू असल्याने त्यास रोखल्याचे सांगितले. तर उपसरपंच रंजना कोथळकर यांनी, गावातील विकास कामांमध्ये मनमानी, गैरप्रकार सुरू आहेत. याबाबत दोन ते तीनवेळा माहिती अधिकारात अर्ज देऊनही अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे बैठकीत विचारणा केली असता असा प्रकार घडल्याचे सांगितले. दरम्यान हा वाद चव्हाट्यावर आल्याने सर्वत्र चर्चा हाेत असल्याचे दिसून आले. गावाचा विकास व्हावा, अशी अपेक्षाही सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.