आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यापैकी कन्हाळे खुर्द, पिंपळगाव खुर्द, माेंढाळे या तीन ग्रा.ंप.वर भाजप, कन्हाळे बुद्रूक, ओझरखेडा या दोन ठिकाणी अपक्ष, तर तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या तळवेल ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत लोकशाही ग्रामविकास आघाडीने ७ जागांवर बाजी मारली. लोकनियुक्त सरपंचपदी आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार विद्या उल्हास भारसके यांनी बाजी मारली.
भाजप पुरस्कृत ज्ञानदेव झोपे यांच्या लोकमान्य ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला. १२ वॉर्डात लोकशाही व लोकमान्य पॅनलला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या. वॉर्ड क्रमांक ४ मध्ये दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २७७ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात कौल मिळून लोकशाही ग्रामविकासच्या ७ जागा झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.