आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जिजाऊ कॉलनी परिसरातील रहिवाशांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन केले. जिजाऊ नगरात हा कार्यक्रम झाला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका शारदा बोरसे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा संघटक रंजना कोळी यांच्या हस्ते झाले. रंजना कोळी यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देताना त्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी आहेत. प्रत्येक महिलेने त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करावे असे आवाहन केले. रंजना कोळी म्हणाल्या की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. महिलांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले. आताची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी आपले पती महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
फुले दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. यावेळी तालुकाध्यक्षा रेखा ढोले, गायत्री मराठे, खुशी सत्रे, अलका हिवरे, सविता तायडे, सुनीता सूर्यवंशी, मीना बरकले, मंगला सोनवणे, दीपाली सोनवने, वैशाली वानखेडे, वैशाली माळी, प्रिती माळी, अलका तायडे, जागृती पाटील, भारती पाटील, बनाबाई शिंगोटे, कल्पना गावंडे, सिंधू निकम, ज्योती वाणी, दर्शिका ढोले उपस्थित होत्या. सविता तायडे या मुलीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे चित्र रांगोळीने रेखाटून सर्वांचे लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.