आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:आठ प्रभागांत अनुसूचित जाती, तर दोन प्रभागांत अनू. जमातीचे आरक्षण ; 13 जून रोजी असे काढण्यात येईल नगरसेवकांचे आरक्षण

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पालिकेची आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) काढली जाणार आहे. नवीन रचनेनुसार २५ वॉर्डातील ५० नगरसेवकांच्या जागेसाठी ८ जागा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी, तर २ जागा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी असतील. प्रभाग क्रमांक १०, ३, ४, २, ५, १३, १९ व १ या आठ प्रभागांत एससी तर प्रभाग क्रमांक ८ आणि २१ या प्रभागांमध्ये एसटी प्रवर्गाचे आरक्षण निघेल. एकूण लोकसंख्येतील अनुसूचित जाती व अनूसुचित जमातीच्या उतरत्या क्रमाने लोकसंख्या गृहीत धरुन हे आरक्षण काढले जाईल. पालिका निवडणुकीसाठी आता प्रशासकीय प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. सोमवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत निघेल. शहरात यापूर्वी २४ प्रभाग व ४८ नगरसेवक होते, आता २५ प्रभाग व ५० नगरसेवक असतील. यापैकी ८ जागा मागासवर्गीय जाती तर २ जागा अनूसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. यात पाच जागा महिलांसाठी आरक्षीत असतील. उर्वरित ४० जागा या सर्वसाधारण असतील. यातील २० जागा या महिलांसाठी राखीव असतील. अर्थात एकूण ५० जागांपैकी २५ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे पालिकेत महिलांच्या संख्याबळाचा समतोल साधला जाईल. तसेच पालिकेच्या आरक्षण सोडतीचे गणित लक्षात घेऊन, इच्छुकांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर या हालचाली आणखी गतिमान होणार आहे.

महिलांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडतीत अनुसूचितीत जाती व अनूसूचित जमाती याचे आरक्षण प्रभागातील प्रवर्गातील लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमाने ठरवले जाईल. या आरक्षणानंतर अनूसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण महिलांची सोडत चिठ्ठीने काढली जाईल. आरक्षीत दहा जागांमध्येही ५० टक्के अर्थात पाच जागांवर महिलांचे आरक्षण असेल. ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढली जाणार आहे.

एससी, एसटी जागांवर प्रक्रिया अशी होणार या प्रक्रियेत प्रथम अनुसूचित जाती या प्रवर्गाचे आरक्षण निघेल. यानंतर अनू. जमातीचे आरक्षण निघेल. प्रभाग १ आणि प्रभाग क्रमांक १३ या दोन्ही प्रभागांतही अनुसूचित जमातींची लोकसंख्या अधिक आहे. मात्र यापूर्वीच प्रवगाचे आरक्षण निघाल्याने उतरत्या क्रमानुसार येणाऱ्या प्रभागांत हे आरक्षण मिळेल. अर्थात प्रभाग आठ व २१मध्ये अनूसूचित जमातींचे आरक्षण निघेल असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...