आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टिक अन्न:पहिल्याच दिवशी गोड पदार्थ देण्यासाठी शाळांचे नियोजन ; साडेचार लाख विद्यार्थ्यांना मिळणार शिजवलेला आहार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत होता; मात्र १३ जूनपासून शाळा नियमित सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न मिळणार असून, त्यासाठी शाळांना धान्याचे वाटपही सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून पौष्टिक अन्न मिळणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्नासह गोड पदार्थही देण्यात यावा यासाठी शाळास्तरावरही नियोजन करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या शाळा बंद होत्या. आता २०२२-२३ या नव्या शैक्षणिक वर्षात १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करताना विद्यार्थ्यांचे जल्लाेषात स्वागत होणार आहे. शिवाय मुलांना पहिल्याच दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके आणि त्यांच्या आवडीचा पोषण आहार मिळणार आहे. पहिल्या दिवसापासून मुलांना शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या दिवशी विद्यार्थी फक्त खेळ, धम्माल, मस्ती करतील. शिक्षण विभागाचा आदेश नसला तरी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड पदार्थ देण्यात यावा याकरता शाळास्तरावर नियोजन सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...