आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर:भुसावळातील गांधी पुतळा मार्गावर अखेर सीलकोट; काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराकडून कामाची पूर्तता

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील १२ कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातील नियोजित कामे मुदत संपूनही पूर्ण झाली नव्हती. यामुळे पालिकेने संबंधित ठेकेदाराला दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टेड केले. मात्र, याच ठेकेदाराने पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून मंजूर महात्मा गांधी पुतळा ते कडू प्लॉट या रस्त्यावर सिलकोट व कारपेटच्या अपूर्ण कामाला मंगळवारी सुरुवात केली. या कामामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला.

शहरातील विशेष रस्ता अनुदानातील रस्त्यांचा निधी वापराची मुदत संपूनही कामे अपूर्ण होती. त्यात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ठेकेदार विनय सोनू बढे अँड कंपनीला १९ मार्चला २ वर्षांसाठी ब्लॅकलिस्टेड केले. याच ठेकेदार फर्मने शहरातील नगरोत्थान महाअभियानातून मंजूर ४ रस्त्यांची कामे घेतली आहेत. यातील दोन कामे पूर्ण झाली असून गडकरी नगरातील रस्त्यांचे कामाला सुरुवात झाली नाही. तर जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते कडू प्लॉट या रस्त्याचे सिलकोट व कारपेट रखडले होते. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याने हे काम होईल कि नाही? अशी शंका होती. मात्र, पालिकेच्या सूचनेनुसार ठेेकेदाराने या मार्गावरील सिलकोट व कारपेटचे काम मंगळवारी पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...