आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोब्रा जातीचा साप:कोब्राला ओट्यावर पाहून उडाली दाणादाण

सावदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बस स्थानक परिसरातील सोमेश्वर नगरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता भलामोठा कोब्रा पाहून अनेकांची पाचावर धारणा बसली. सोमेश्वर नगरात नुकतेच घराचे बांधकाम केलेले चौधरी कुटुंबीय कामात व्यस्त होते. त्यांचे शेजारी वासुदेव बेंडाळे यांचे कुटुंबीय शतपावली करत होते. चौधरींच्या ओट्यावर काहीतरी हालचाल जाणवताच त्यांनी रोखून पाहिल्यावर कोब्रा जातीचा साप असल्याचे लक्षात आहे. यामुळे त्यांनी लोकांना सावध केले.

या भागातून ये-करणारी प्रत्येक व्यक्ती चौधरींच्या घरासमोर थांबून फणा काढून बसलेल्या कोब्राचे दूरूनच मोबाइलमध्ये फोटो टीपत होते. मात्र, धोका ओळखून तातडीने फैजपूर येथील सर्पमित्र नीरज नंदाने यांना चौधरी यांच्या घरी बोलावण्यात आले. त्यांनी अतिशय शिताफीने ओट्यावर फणा काढून फुत्कार सोडणाऱ्या कोब्राला एका प्लास्टिकच्या बाटलीत कैद केले. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, सोमेश्वर नगरात पथदिवे सुरू करावे, अशी मागणी आहे. अनेकवेळा आश्वासने देऊन पालिकेने ती पाळली नाहीत.यामुळे रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका पाहता पथदिवे लावणे गरजेेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...