आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी परस्पर विक्री केले. या प्रकरणी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व शाम तिवारी अटकेत आहेत. मंगळवारी तपासाधिकरी अंबादास पाथरवट यांनी इंगळे व तिवारी यांना सोबत घेऊन गुन्ह्यात वापरलेले तहसीलदारांचे बनावट पत्र ज्या संगणकावर तयार झाले त्याची हार्डडिस्क जप्त केली. यावेळी फिर्यादी नायब तहसीलदार शोभा घुले यांचे जबाब नोंदवून घेतले.
जनकल्याण अर्बनचा विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचा बनावट आदेश वापरून पतसंस्थेचे १० प्लॉट परस्पर विकले. त्यामुळे धांडेसह प्लॉट घेणाऱ्या दहा जणांविरुद्ध १७ जुलैला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर धांडेला अटक झाली. तो सध्या कारागृहात आहे. तर ३१ जुलैला याच प्रकरणात नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक झाली. मंगळवारी दुपारी १ वाजता पोलिसांनी दोन्ही संशयितांना सोबत घेत तहसील कार्यालय गाठले. तेथे फिर्यादी नायब तहसीलदार शोभा घुले यांच्याकडून काही महत्वपूर्ण कागदपत्रे घेत जबाब नोंदवला. लिपिक तिवारी जेथे बसत हाेते, त्या टेबलवरील संगणकाची हार्डडिस्क जप्त केली. सुमारे दीड तास ही चौकशी झाल्यावर पोलिस पथक तहसीलमधून बाहेर पडले. या चौकशीतून सत्य बाहेर येईल. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.