आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महसूल विभागातर्फे गणेश चौधरींची निवड

रावेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून रावेर तलाठी कार्यालयातील कोतवाल गणेश चौधरी यांची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे २२ व २३ जून रोजी होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रावेर तलाठी कार्यालयाचे कोतवाल गणेश चौधरी लवकरच रावेर येथून रवाना होणार आहेत. स्पर्धेसाठी कोतवाल गणेश चौधरी यांना प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, तलाठी दादाराव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान या निवडीमुळे चाैधरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...