आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंमूल्यमापन:शाळांनी ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारा स्वयंमूल्यमापन; शिरसाड जिल्हा परिषद शाळेस स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान

यावल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेस केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या, स्वच्छ विद्यालय पुरस्कारा अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार १७ रोजी देण्यात आली. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सीईओ डॉ. पंकज आशिया, आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापिका संगिता पाटील व केंद्राप्रमुख किशोर चौधरी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

जिल्ह्यातील अनेक शाळांनी ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारा स्वयंमूल्यमापन पूर्ण करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारे बाह्य मूल्यमापन पूर्ण होऊन पुरस्कारासाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. शाळामध्ये स्वच्छता आणि स्वच्छता पद्धतीमध्ये सुधार होण्यासाठी, शाळा आणि विद्यार्थी यांना त्याबाबत प्रेरणा मिळावी यासाठी शाळेतील शौचालय सुविधा, हात धुण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, कोविड १९ अनुषंगाने वर्तन अशा ५९ निकषांवर आधारित मूल्यमापन यामध्ये समाविष्ट होते. शिरसाड शाळेने अपेक्षित बाबींची पूर्तता करत ९९% गुण आणि ५ स्टार रेटिंग मिळवत हा पुरस्कार मिळविला आहे. यासाठी यावल तालुक्याचे संपर्क अधिकारी तथा डायट चे वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे, गटशिक्षणाधिकारी एन. के. शेख, विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके, प्रभारी केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले.

बातम्या आणखी आहेत...