आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यात आला. नाईक महाविद्यालय, पोलिस स्टेशन व वन विभागात महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी, वन विभागात कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रवास खडतर असतो. कुटुंबाची जबाबदारी पेलून दिवसरात्र दऱ्याखोऱ्यात ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता त्या सेवा देतात, अशा शब्दात कौतुक केले. व्ही.एस.नाईक महाविद्यालयात रासेयो एककाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल, तर सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील व आयक्यूएसी समन्वयक एस.आर.चौधरी प्रमुख पाहुणे आणि प्रा.चांदणी समर्थ प्रमुख वक्त्या होत्या.
प्रा.एस.डी.धापसे यांनी सूत्रसंचलन केले. ग्रंथपाल बी.जी.मुख्यादल यांनी आभार मानले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.बी.गव्हाड यांच्यासह स्वयंसेवकांनी सहकार्य केले. वन विभागातर्फे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्यावर आवश्यक असणारी खाकी साडी देऊन सत्कार केला. कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कार्यालयात केक देखील कापण्यात आला. रावेर पोलिस ठाण्यात देखील दक्षता समितीच्या पदाधिकारी महिलांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या प्रगतीत महिलाशक्तीचा सिंहाचा वाटा आहे. अनेक महिलांनी केलेले काम पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. महिलादिनी या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होणे अपेक्षित आहे, असा सूर यावेळी उमटला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.