आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामकरसंक्रात जवळ येत असल्याने तिळीची मागणी वाढली. परिणामी गेल्या १५ दिवसांत तिळाचे दर तब्बल ६० रूपये किलोने वाढले आहेत. यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा तिळीवर भाववाढीची संक्रांत आली आहे. त्यामुळे यंदा गोडवा महागला आहे. मकर संक्रांतीला एकमेकांना तिळ-गुळ दिले जाते. त्यासाठी संक्रांतीच्या काही दिवस अगोदर बाजारात तिळीची मागणी वाढते. यंदा देखील मागणी वाढली असली तरी सोबतच दरवाढ देखील झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिळाचे किलोचे दर सरासरी १६० रुपये किलो होते. ते आता २२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. गुळाचे दर मात्र ५० ते ६० रूपये किलाेवर स्थिर आहेत. ही दरवाढ पाहता तिळ-गुळासोबतच यंदा तिळीच्या वड्या, लाडूंची भाववाढ होऊ शकते. सध्या तिळीच्या लाडूचे पाकिट ५० ते ९० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात लहान आकाराचे १२ ते २० लाडू येतात. या उद्योगातून अनेक महिलांना स्वयंरोजगार देखील मिळाला आहे. काही ठिकाणी बचत गटाच्या महिला देखील तीळ-गुळ तयार करून विक्री करतात.
तांदूळ, तीळ दान करा सन २०१८ मध्ये १४ जानेवारी, २०१९-२०२०मध्ये १५ जानेवारी, २०२१ व २०२२ या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला होती. येणाऱ्या २०२४ मध्ये १५ जानेवारी, २०२५ व २६ वर्षात १४ जानेवारी, २०२७ व २०२८ या वर्षी ती १५ जानेवारीला साजरी होईल. संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करावे. सूर्याला अर्ध्य द्यावे. या दिवशी तांदूळ, काळी तीळ, ताम्र कलश आदी दान करावे असे ज्याेतिषाचार्य विनायक जाेशी यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना सांगितले.
तालुक्यातील अनेक शेतकरी केवळ घरगुती वापरापुरती तिळीची पेरणी करतात. शिल्लक राहणारी तीळ मकर संक्रांतीपूर्वी शहराच्या बाजारात विक्रीसाठी आणली जाते. तर काही व्यापाऱ्यांना विक्री करतात. पण, त्यात अपेक्षित भाव मिळत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.