आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:घरकुलातील सांडपाणी थेट रस्त्यावर; रहिवाशांची गैरसोय

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लोणारी हॉलसमोरील रिंगरोड असलेल्या पालिकेच्या घरकुलांमधील सांडपाणी वाहतुकीच्या रस्त्यावर येते. यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पालिकेने सांडपाण्याची विल्हेवाट लावून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी आहे.

पालिकेने हुडको परिसरात घरकुल बांधून ठेवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे घरकुल बांधून तयार होते. मात्र तेथे रहिवास नव्हता. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढल्यावर उघड्यावर संसार आलेल्या अनेक कुटुंबांना या घरांचा आधार मिळाला. मात्र, या घरांमधील सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नाही. आता हे सांडपाणी रस्त्यावर येते.

बातम्या आणखी आहेत...