आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता:सुशोभिकरण केलेल्या बोगद्यात गटारीचे सांडपाणी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील उत्तर-दक्षिण भागांना जोडणाऱ्या लोखंडी बोगद्यात पालिकेने गेल्या वर्षी सुशोभीकरण केले. यामुळे अस्वच्छ बोगद्याचे रुपडे बदलले. मात्र, सोमवारी याच भागातील कॉसमॉस बँकेजवळ गटार तुंबून सांडपाणी थेट बोगद्यापर्यंत पोहोचले. यामुळे बोगद्यात पुन्हा अस्वच्छता झाली. सोमवारी वाहतुकीच्या एका व पादचारी बोगद्यात गटारीचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना त्यातून ये-जा करावी लागली.

शहरातील उत्तर व दक्षिण भागाला जोडणाऱ्या लोखंडी बोगद्याची पालिकेने रंगरंगोटी केली. बोगद्याच्या भिंतीवर जलजैवविविधता, अंतरिक्ष थीमवरील चित्रे काढली. पथदिवे बसवून सायंकाळनंतर होणारी गैरसोय दूर केली. मात्र सोमवारी कॉसमॉस बँकेजवळ गटारी तुंबून सांडपाणी थेट बोगद्यात साचले. यामुळे बोगद्याच्या सौंदर्यीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले. नागरिकांना सांडपाण्यातून ये-जा करावी लागली. काँसमॉस बँकेजवळ रस्त्याचे कामे सुरु असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले. पालिकेने ही समस्या सोडवावी, अशी मागणी मागणी पुढे आली.

बातम्या आणखी आहेत...