आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार:अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींमध्ये मदत करणाऱ्या तिघांचा समावेश

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नायगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातील तरूणाने अपहरण केले. यानंतर नाशिक येथील नातेवाइकाच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. चार दिवसानंतर ही पीडिता घरी परतली. यानंतर रविवारी १ मे रोजी यावल पोलिसांत चार जणांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

नायगाव येथील १६ युवतीचे २७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरूण चंद्रकांत उर्फ भूषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने महेंद्र कोळी (आसोदा ता.जळगाव) याच्या मदतीने अपहरण केले. त्या मुलीला नाशिक येथील त्याच्या बहिणीचे जेठ जितेंद्र कोळी व दीपाली जितेंद्र कोळी यांच्या घरी घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. चार दिवस अल्पवयीन नाशिकला होती. नंतर रविवारी घरी येताच तिने घडलेली घटना कुटुंबाला सांगितली. दरम्यान, यामुळे कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संशयित चंद्रकांत उर्फ भूषण सोनवणे (कोळी) याच्या ताब्यात घेतले. अपहरणासाठी मदत करणारा महेंद्र कोळी व नाशिक येथील दाम्पत्य जितेंद्र व दीपाली कोळी अशा चौघांविरूद्ध पोस्को म्हणजेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. चंद्रकांत सोनवणे याला अटक करण्यात आली. सोमवारी त्यास विशेष बाल न्यायालयासमोर हजर केले असता ५ मेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करत आहे. इतर तिघांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...