आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय्यत तयारी:एरंडोलला 15 रोजी इनडोअर स्टेडियमचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन; पालकमंत्री, कृषी मंत्र्यांसह सात मंत्र्यांची राहणार उपस्थिती

एरंडोलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालायाच्या नवीन इमारत परिसरातील इनडोअर स्टेडियमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते १५ एप्रिलला दुपारी २ वाजता उद‌्घाटन होणार आहे.

अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील राहणार असून या कार्यक्रमास ७ मंत्री उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार दिगंबर शंकर पाटील यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त व संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इनडोअर स्टेडियमचे उद‌्घाटन हाेईल. तसेच माजी विद्यार्थ्यांचा जल संपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री दादा भुसे, उर्जा व शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार सुधीर तांबे, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, अरुण गुजराथी, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनावणे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी आमदार महेंद्रसिंह पाटील, मनीष जैन आदी उपस्थित राहतील, असे संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, उपाध्यक्ष अॅड. आनंदराव पाटील, सचिव कोकीला पाटील यांनी कळवले आहे.