आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शरद सोनवणे‎

भुसावळ‎6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

‎महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर‎ यांची १३१ वी जयंती जल्लोषात‎ साजरी करण्यात येणार आहे. त्या‎ अनुषंगाने शहरातील शासकीय‎ विश्रामगृहात शनिवारी झालेल्या‎ बैठकीत जयंती उत्सव समितीच्या‎ अध्यक्षपदी सर्वानुमते शरद सोनवणे‎ यांची निवड करण्यात आली.‎ रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू‎ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात व‎ मार्गदर्शनाखाली झालेल्या या‎ बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे‎ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश‎ मकासरे होते.

यावेळी रिपाइं‎ जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, पीआरपी‎ महाराष्ट्र उपाध्यक्ष जगन सोनवणे,‎ माजी नगरसेवक रवी सपकाळे,‎ माजी नगरसेवक संतोष बारसेआदी‎ उपस्थित होते. बैठकीत उत्सव‎ समितीच्या अध्यक्षपदी शरद‎ सोनवणे यांची एकमताने निवड‎ करण्यात आली. यावेळी लक्ष्मण‎ जाधव, रवी निकम, सुदाम‎ सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश‎ सोनवणे, पप्पू सुरळकर, विश्वास‎ खरात, उल्हास पगारे, प्रकाश‎ तायडे, सुनील ढिवरे, दिलीप मोरे,‎ महेंद्र सोनवणे, बाळा पवार, संतोष‎ भगत, संतोष साळवे, गोरखनाथ‎ सुरवाडे, नरेश गडवे, बंडू देशमुख,‎ शरद जवरेआदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...