आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाेभायात्रा:सर्वज्ञ चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त निघाली शाेभायात्रा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी महोत्सवाला गुरुवारी शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिरात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेने भुसावळकरांचे लक्ष वेधले.

म्युनिसिपल पार्कातील श्रीकृष्ण मंदिरापासून दुपारी २ वाजता या शाेभायात्रेस प्रारंभ झाला. सुशाेभित बग्गीत श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींची मूर्ती िवराजमान केली हाेती. आराध्य प्रतिष्ठानतर्फे या शाेभायात्रेचे आयोजन करण्यात आले. दगडी पुल, पांडुरंग टॉकीज, अहिल्यादेवी हायस्कूल, नवशक्ती संकुलापासून बालाजी मंदिर, दगडी पूल, गवळी वाडा या मार्गाने श्रीकृष्ण मंदिरात शाेभायात्रेचा समारोप झाला. या शाेभायात्रेचे नेतृत्व आराध्य प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वैशाली आराध्य यांनी केले. शाेभायात्रेच्या अग्रभागी दाेन अश्व हाेते.मुलींचे लेझीम व महिलांचे झांज पथक, डीजे, बॅन्जाे वाद्य, पुरुषांचे झांज पथक यांचा सहभाग हाेता. भाविकांनी मूर्तीचे दर्शन घेतले. मार्गावर अनेक भाविकांनी शाेभायात्रेवर फुलांचा वर्षाव केला. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी चहा, फराळाची व्यवस्था केली हाेती. येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे शाेभायात्रेने लक्ष वेधून घेतले. यावेळी चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

श्री चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी महोत्सवात सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. सकाळी पारायण, झेंडावंदन, भजन, देवास मंगलस्नान तर दुपारी आरती व प्रसाद वितरण असे कार्यक्रम झाले. मंगळवारी सकाळी सूत्रपाठाचे सामुहिक पारायण, आरती, प्रसाद वितरण तर बुधवारी सकाळी आठ वाजेपासून श्री चक्रधर स्वामींच्या लीलांचे चिंतन करण्यात आले. गुरुवारी शाेभायात्रा काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...