आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुका लटके विजयी झाला. यानिमित्त रविवारी बस स्टँड चौकात फटाके फोडून शिवसैनिकांनी जल्लोष केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा रमेश लटके ह्या उमेदवार होत्या.
३ तारखेला मतदान होऊन रविवार ६ तारखेला मतमोजणी झाली. त्यात ऋतुजा लटके या भरघोस मतांनी निवडून आल्या. लटके यांचा विजय घोषित झाल्याने वरणगाव शहरात शिवसेनेने बस स्टॅण्ड चौकात फटाके फोडून जल्लोष केला. रावेर लोकसभा जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसख्यांक जिल्हा संघटक शेख सईद, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, गुणवंत भोई, सुनील भोई, सुरेश चौधरी, शिवा भोई, प्रल्हाद माळी, किरण माळी, शेख सत्तार, सद्दाम मुल्लाजी, विक्की मोरे, सुनील देवघाटोले, प्रकाश कोळी, उल्हास भारसके, भुरा पाटील, शंकर पाटील, राजेश महाजन, राजेश थोरात, प्रवीण वाकोडे, नंदू खराटे, संजू खराटे, नितीन बोदडे, रितेश माळी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.