आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्यासारखा सामान्य रिक्षाचालकाला शिवसेनेमुळेच खान्देशातील पक्षाचा पहिला आमदार होता आले. राणे फुटले तेव्हा त्यांनी मला सोबत येण्यासाठी ऑफर देत मोठी रक्कम आणि मंत्रीपदाचे आमीष दिले होते. पण, मी निष्ठा जपली. पक्षशिस्त व शिवसेना प्रमुख देतील तो आदेश मानणारी आमची शिवसेना आता फुटत असल्याचे पासून मन खिन्न झाले आहे. जेवणदेखील कडू लागतेय. टोकाचा निर्णय घेण्याऐवजी लहान मुले ज्याप्रमाणे आई, वडिलांकडे गाऱ्हाणी करतात तसे गाऱ्हाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे वेळीच केली असती तर आजचा दिवस पाहावा लागला नसता, अशी भावना सेनेचे भुसावळचे माजी आमदार दिलीप भोळे यांनी सध्याच्या घडामोडींवर व्यक्त केली.
शिवसेना एकसंघ पक्ष आहे. शिस्त व आदेशावर चालणाऱ्या पक्षातील आमदार फुटताना पाहून मनाला अतिशय दु:ख होत आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काहींची नाराजी असेल तर त्यांनी ती बाब त्यांना सांगायला हवी होती. मात्र, आमदारांनी उचललेले पाऊल हे टोकाचे आहे. काही जणांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा मुद्दा व इतर बाबतीत सांगितलेही असेल तर त्यांनीदेखील ऐकून घ्यायला हवे होते. पण पक्ष फुटायला नको. आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. यापुढील काळातही शिवसैनिकच राहू, असे सांगताना माजी आमदार भोळे यांचा स्वर काहीसा कातर झाला. मात्र, ५६ वर्षात अनेक आव्हाने पेलणारी संकटात तावून सुलाखून बाहेर पडली. आता देखील ती फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईल. भगवा डौलाने फडकत राहील, असे भोळे म्हणाले.
हिंदुत्त्वासोबत काही अंशी तडजोड झाली बंड पुकारणारे मंत्री व आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. याबाबत माजी आमदार दिलीप भोळे यांना विचारणा केली असता. होय शिवसेनेने काही अंशी हिंदुत्वाशी तडजोड केली. दोन वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांसोबत असल्याने काही अंशी हा मुद्दा भरकटला होता, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.