आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रावण महिन्यात शहरातील रानातला महादेव मंदिर, डॉ.मुखर्जी उद्यानातील नर्मदेश्वर महादेव मंदिर व नवीन सतारे भागातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. या सर्व मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. विशेषत: दुसऱ्या सोमवारपासून मंदिरात गर्दी वाढायला सुरूवात होते.
रानातला महादेव मंदिर
जामनेर रोडवरील हुडको भागातील रानातला महादेव मंदिर सन १९३४ मध्ये स्वयंभू शिवपिंडीतून साकारले गेले. पूर्वी शहराबाहेर दूर रानावनात असल्याने या मंदिराला रानतला महादेव असे नाव पडले. २००४ मध्ये स्व. देविदास फालक यांच्या हस्ते जीर्णोद्धार झाला. अतुल गुरव हे पुजारी, तर महेश फालक, डॉ.मोहन फालक, प्रकाश फालक हे मंदिराचे व्यवस्थापन सांभाळतात.
ओंकारेश्वर महादेव मंदिर
नवीन सतारे भागातील ओंकारेश्वर महादेव मंदिर ६० वर्षांपूर्वी उभारले गेले. १९७२ मध्ये तत्कालीन नगरसेवक स्व. किशन अग्रवाल व दानशूरांनी जीर्णाेद्धार केला. यानंतर २०१९ मध्ये पुन्हा मंदिराची नव्याने उभारणी झाली. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती असलेली पिंड या मंदिरात आहे. दोनवेळा जीर्णोद्धार होऊनही पुरातन पिंड कायम आहे.
नर्मदेश्वर महादेव मंदिर
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील नर्मदेश्वर महादेव मंदिराची स्थापना ३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाली होती. कालांतराने जिर्णोद्धार झाला. शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. श्रावण महिन्यात दररोज व सोमवारी विशेषत्वाने गर्दी होते. महाशिवरात्रीला फराळ वाटप केले जाते. मंदिराच्या समोरील सभामंडपात श्रावणात भजनांचे कार्यक्रम होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.