आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटने आग:कोरपावली शिवारात शॉर्टसर्किटने आग, तोडणीवरील‎ ऊस जळाला; पंचनामा होईल, भरपाईचे नक्की नाही‎

यावल‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोरपावली येथील ‎शेतकऱ्याच्या बारा महिन्यांच्या‎ उसाच्या पिकाला शॉर्टसर्किट हाेवून ‎आग लागली. त्या आगीत संपूर्ण‎ ऊस जळून खाक झाला. त्यामुळे ‎शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले ‎ असून हातातोंडाशी आलेला घास‎ या आगीच्या घटनेने हिरावला आहे. ‎याबाबत राज्य महावितरण‎ कंपनीच्या दहिगाव कक्षाला माहिती ‎ देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी ‎घटनास्थळी जावून पाहणी करून ‎ माहिती घेतली.‎ कोरपावली येथील नीळकंठ हरी‎ अडकमोल यांनी बटाईने केलेल्या‎ शेतात उसाची लागवड केली होती.‎ गावापासून तीन कि.मी. अंतरावर‎ त्यांच्या उसाच्या शेतात शॉट‎‎ सर्किटमुळे अचानक आग लागली.‎

बघता बघता आगीने राैद्र रूप धारण‎ केल्याने संपूर्ण ऊस जळून खाक‎ झाला. बारा महिने मशागत व मेहनत‎ करून पिकवलेला हा ऊस शॉर्ट‎ सर्किटमुळे जळून खाक झाला‎ आहे. या घटनेत संबंधित‎ शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान‎ झाले आहे. त्याबाबत राज्य‎ महावितरण कंपनीच्या दहिगाव‎ कक्षाचे अभियंता धांडे यांना माहिती‎ देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी‎ येऊन पाहणी केली आहे.‎ शेतकऱ्याने यावेळी तक्रार अर्ज‎ दिल्यानंतर या घटनास्थळ,‎ नुकसानीचा पंचनामा केला जाणार‎ असल्याचे वीज महावितरण‎ कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...