आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:तुटवडा मीटरचा की खांबांचा ? ; आढावा बैठक : ऊर्जामंत्री राऊतांनी काढली महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी कृषी कनेक्शनसाठी डिमांडनोट भरली मात्र त्यांना नवीन वीज कनेक्शन का दिले नाही? वीज मिटरचा तुटवडा तर कधी पोल नसल्याचे सांगितले जाते, तुटवडा कशाचा ते आधी निश्चित करा. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी नेमक्या अडचणी काय? असा सवाल करुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. दीपनगर औष्णिक केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या सभागृहात उर्जा मंत्री राऊत यांनी शुक्रवारी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व विद्युत निरिक्षकांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाची माहिती जाणून घेतली. उर्जामंत्र्यांच्या हस्ते स्टिम टर्बाईनचे लिफ्टींग झाले, मात्र त्यांनी माध्यमाशी बोलताना बॉयरल लिफ्टींग केल्याचे सांगितले. उर्जामंत्र्यांना नेमके आपण कशाचे पुजन व शुभारंभ केला तेच माहित नसल्याची बाब समोर आली. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दीपनगर औष्णिक केंद्रात पाहणी व स्टिम टर्बाईन लिफ्टींगचा शुभारंभ केला. यावेळी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जामनेरच्या ज्योत्सना विसपुते, महानिर्मितीचे प्रकल्प संचालक संजय गारुडकर, ६६० मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, ५०० बाय दोन वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे तुटवडा मीटरचा की खांबांचा ? प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मनोहर तायडे, एन. आर. मुंडे, काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. उर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी प्रथम दीपनगर ५०० मेगावॅटच्या पीसीआर विभागाला भेट देऊन पाहणी केली. वीजनिर्मिती व कोळशाच्या साठ्याचा धावता आढावा घेतला. ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या स्टीम टर्बाइनचे लिफ्टींग कामाचा त्यांच्याहस्ते शुभारंभ झाला. यानंतर ६६० मेगावॅट प्रकल्पात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आदी विभागाच्या परिमंडळ मुख्य अभियंत्यांसोबत आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या प्रश्नावरुन घेतले. अधिकाऱ्यांकडून कधी पोलचा तर कधी मिटरचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मात्र नेमका तुटवडा का आहे? यावर मार्ग काढून डिमांडनोट भरुनही वीजकनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कनेक्शन दिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबत परिमंडळात विजेची गळती व थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याने विजेची गळती कमी करा, यासाठी विजचोऱ्या थांबवा तसेच थकबाकी वसूल करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अडीच तास लेटलतिफ : उर्जा मंत्री राऊत हे दीपनगर केंद्रात बुधवारी १२ वाजता पोहोचणार होते. तर दुपारी दोन वाजेपासून त्यांची पाहणी व आढावा बैठक होती. मात्र ते दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेच्या दरम्यान दीपनगर केंद्रात पोहोचले. आढावा बैठकीसाठी अधिकारी १२ वाजेपासून ताटकळत होते. उर्जामंत्री तब्बल अडीच तास उशिरा आले. दौऱ्याच्या नियोजनात जामनेर तालुक्याला भेट देण्याबाबत नियोजन नव्हते, मात्र दुपारी रावेर, यावल तालुक्यातील कार्यक्रम आटोपून त्यांनी जामनेर गाठले, यामुळे नियोजित आढावा बैठक व सर्व कार्यक्रम अडीच तास लेट झाले.

पदाधिकाऱ्यांना दिला प्रवेश : आढावा बैठकीच्या वृत्तांकनासाठी दीपनगर ६६० मेगावॅट प्रशासनाने पत्रकारांना प्रवेश नाकारला. प्रोजेक्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारातूनही प्रवेश दिला नाही, मात्र आढावा बैठकीत मंत्री महोदयांसोबत काही काँग्रेसचे पदाधिकारीही बसले होते. तर बरेच पदाधिकारी प्रकल्पाच्या आवारात होते. आढावा बैठक सुरु झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याने ते बाहेर आले. वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना डावलून पदाधिकारी आत कसे? असा प्रश्न उपस्थित झाला.

भाजप आंदोलकांना टाळले : वरणगाव येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे व पदाधिकाऱ्यांनी उर्जा मंत्र्यांच्या भेटीची वेळ मागतली होती. ५०० मेगावॅटच्या प्रवेशद्वारावर काळेंसह पदाधिकाऱ्यांना अडवण्यात आले. मंत्री याच रस्त्याने बाहेर निघतील, तेव्हा निवेदन देता येईल, असे सांगण्यात आले. यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी उर्जा मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर उर्जामंत्री भाजप पदाधिकाऱ्यांना गुंगारा देत २१० प्रकल्पाच्या गेटमधून निघून गेले. लग्नाची तयारी सुरु असताना काळाची...

संसार फुलण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घातला. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्याच्या सासरकडील मंडळी मुक्ताईनगरला दाखल झाली. पवन चौधरीचा २२ मे रोजी विवाह होता. लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासह नियोजनासाठी तो लवकरच सुट्टीवर जाणार होता. निदान लग्नासाठी तरी सुट्टी घे असा तगादा कुटुंबियांनी त्याच्याकडे लावला होता. पवनने लग्नाची तारीख जवळ आल्यावर सुट्टी घेतो असे सांगितले होते. धनराज पाटील व भालचंद्र पाटील हे मित्र होते. दोघेही कुटुंबात एकुलते एक होते. उमेश सोलंकी विवाहित होता. देवपूरातील गोंदूर रोडला लागून असलेल्या बोरसे नगरात तो राहत होता. त्याचा मोठा भाऊ छायाचित्रकार असून तो राजस्थानला गेला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर ताे शहराकडे येण्यास निघाला होता.

चौघे होते डेअरीत कामाला : मृतांच्या निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार चौघे बिलाडी रोडला लागून असलेल्या दूध प्रकल्पातील वसुंधरा डेअरीत कामाला होते. धुळ्यातून दुधाचा टँकर रोज नागपूरला जातो. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा टँकर रवाना झाला होता. त्यामुळे चाैघे अन्य वाहनाने दूध दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्यासाठी गेले होते. त्या वेळी हा अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...