आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मोत्सव:श्रीकृष्ण जन्मोत्सव, रात्री उशिरापर्यंत मंदिरे फुलली

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहरात गुरुवारी दिवसभर गोकुळ अष्टमीचा उत्साह दिसला. श्रीकृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवावेळी भक्तीपर्वाला उधाण आले. या उत्सवासाठी मंदिरांमध्ये फुले, रांगोळ्या, पताकांनी आकर्षक सजावट व रोषणाई केली होती.

शहरातील म्युनिसिपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदीर, चक्रधर नगरातील चक्रधर मंदिर, व्हीएम वाॅर्डातील इस्कॉन मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली. म्युनिसिपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरात गुरूवारी सकाळी ६ ते ८ देवपूजा, वंदन, ८ वाजता प्रभातफेरी, रात्री ८ ते ११ भजन संध्या रंगली. यानंतर रात्री ११.३० वाजता भगवान श्रीकृष्णाचा पाळणा व नंतर मंगलस्नान व अभिषेक करण्यात आला. १२ वाजता श्रीकृष्ण जन्माेत्सव, छप्पन भाेग व १२.३० वाजता महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप झाले.

इस्कॉनचा भव्य कार्यक्रम
इस्कॉनतर्फे कमल गणपती हॉलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली. भगवंतांचे कीर्तन, महाभिषेक, रासयात्रा दास यांचे प्रवचन झाले. पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव, मथुरा ते गोकुळ प्रवासादरम्यानची नाटिका सादर केली. सुमारे दोन हजार भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...