आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्तबद्ध:वरणगावात 73 गणेश मंडळांतर्फे श्री विसर्जन; हतनूर धरणाच्या नव्या पुलावर साेहळा

वरणगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पारंपारिक वेशभूषा, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात ७३ गणपतींचे रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले. यावेळी चाेख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहरा दुपारी चार वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजता शेवटच्या गणपती विसर्जनाने समाप्त झाली. पोलिसांनी दिलेल्या क्रमानुसार गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करत शांततेत मिरवणूक पार पडली.

नवीन वसाहतीमध्ये पारंपरिक वेशभूषा, फेटे व लेझीमच्या पथकाने ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरत गणरायाला निरोप दिला. शहराबाहेरील परिसरातील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन थेट हतनूर धरणावर करण्यात आले. या ठिकाणीही शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने गणरायाला निराेप दिला.

पोलिसांसह हाेमगार्ह तैनात : प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात सपोनि आशिषकुमार आडसूळ, परशुराम दळवी, होमगार्डचे अधिकारी संजय चौधरी, गोपनीयचे राहुल येवले, वाहतूक पोलिस रामचंद्र मोरे, होमगार्ड रामा चौधरी, महेश पाटील, श्रीराम माळी, महावितरणचे कर्मचारी व शांतता समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीसाठी सहकार्य केले.

पुरामुळे नव्या पुलावरून केले श्री विसर्जन
मध्य प्रदेशात पाऊस सुरू असल्याने हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते. यामुळे भाविकांनी नवीन पुलावरून गणेशाचे विसर्जन केले. यावेळी जागोजागी विजेचे दिवे लावले होते. पाण्यात पट्टीने पोहणाऱ्या तरुणांचीही नियुक्ती केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...