आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:फेकरी टोलनाका बंद करा, मनसेची महामार्गावर निदर्शने

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद ते चिखली या महामार्गासाठी नशिराबाद येथे टोलनाका आहे. तरीही फेकरी येथे स्टँडअलोन नाक्याच्या नावाखाली टोल वसूल केला जातो. हा नाका तातडीने बंद करावा, या मागणीसाठी मनसेने फेकरी टोलनाक्यावर निदर्शने केली. यामुळे नाक्यावरील वाहतूक १५ मिनिटे ठप्प झाली. नंतर टोलनाका व महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर ६० किलोमीटर अंतरात एकच टोलनाका असावा, असा नियम आहे, याकडे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांनी आंदोलनात लक्ष वेधले. नंतर टोलनाका प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले. शहराध्यक्ष प्रदीप भंगाळे, शहर उपाध्यक्ष शिवा वाढे, योगेश पाटील, पद्माकर साळुंके, नेहल कुरकुरे, पवन कोळी, प्रणय भागवत, अनिकेत भोळे, चेतन बाणाईत, शिरीष सपकाळे, युवराज पाथरवट, महेंद्र सपकाळे, सतीश कोळी उपस्थित होते. सर्वांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. ----

बातम्या आणखी आहेत...