आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:सिद्धेश्वर मंडळाने केला माजी सैनिकांचा सत्कार

वरणगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. त्यात देशाचे रक्षण करणारे सीमेवरील सैनिकांचा गौरव व्हावा म्हणून वरणगाव येथील श्री सिद्धेश्वर मित्र मंडळाने सेवानिवृत्त मेजर भरत लक्ष्मण तायडे यांचा सत्कार केला. गणेशोत्सवात त्यांच्या हस्ते मानाची आरती केली. शहरातील जुन्या भाजीबाजारात श्री सिद्धेश्वर मित्र मंडळामार्फत विविध विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे यंदा सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मेजर भरत तायडे यांचा गौरव करण्यात आला.

सिद्धेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष धीरज देवगिरीकर, उपाध्यक्ष राम शेटे, सदस्य तुकाराम माळी, प्रकाश शेटे, अशोक शेटे, अनिल शेटे, मनोज वाणी, राजू देवगिरीकर, अरुण माळी, राहुल माळी, कृष्णा माळी, संदीप माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...