आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या एकाचवेळी सात ते आठ रेल्वे गाड्यांचे निरीक्षण करून देखभाल दुरुस्तीची क्षमता असलेल्या भुसावळातील रेल्वे यार्डचे नूतनीकरण सुरू आहे. हे नूतनीकरण झाल्यावर स्मार्ट यार्ड तयार होऊन तेथे एका दिवसात १६ पेक्षा मालगाड्यांची एकाचवेळी देखभाल दुरुस्ती शक्य होईल. भुसावळ रेल्वे यार्ड आशिया खंडात नावाजलेले आह. तेथे दिवसभरात ८ मालगाड्यांची देखभाल केली जाते. यात वाढ करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने यार्डचे नूतनीकरण सुरू आहे. यामुळे भविष्यात भुसावळच्या यार्डात एकाचवेळी १६ ते २० मालगाड्यांचे निरीक्षण करता येईल. यासाठी मुंबई येथून रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी के.एन. सिंग व सहकारी भुसावळात आले होते. त्यांनी यार्डसोबतच आरओएच डेपोची देखील पाहणी केली. स्मार्ट यार्ड करण्याच्या दृष्टीने डीआरएम एस.एस.केडिया, एडीआरएम नवीन पाटील, वरिष्ठ परिचलन प्रबंधक आर.के.शर्मा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष यार्ड, आरओएच डेपो, लोको शेड परिसरात पाहणी पुन्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी के.एन. सिंग यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.